मेक्सिकोमध्ये आठवड्यात आणखी एका पत्रकाराची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/hector-.jpg)
मेक्सिको – मेक्सिको शहरात एका पत्रकाराची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीसांने दिली आहे. या पत्रकाराची मारहाण करून हत्या करण्यात आल्याचे समजते. डेली एक्सेलसियर या वृत्तपत्राचा पत्रकार हेक्टर गोन्सल्वेस याची मंगळ्वारी तमौलीपस येथे हत्या करण्यात आली. हेक्टर गोन्साल्वेसच्या हत्येमागच्या कारणाचा आणि हत्या करणाराचा शोध चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले.
पत्रकाराची हत्या होण्याची ही या आठवड्यातील दुसरी घटना आहे. 24 मे रोजी 54 वर्षीय पत्रकार एलिसिया डियाज तिच्या न्यूवो लियॉन येथील आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तिच्या मस्तकावर जखमांचे घाव होते.
वृत्तपत्र स्वातंत्र संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सन 2012 मध्ये राष्ट्रपती एन्रिक पीना नीटो यांनी पदभार स्वीकारल्यापासून सुमारे 42 पत्रकारांच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत. आणि 2,000 पेक्षा अधिक पत्रकारांवर हल्ले करण्यात आलेले आहेत.