Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण; एकूण आकडा ९ हजारांवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Maharashra-corona-1.jpg)
करोनानं सध्या देशात आणि राज्यात थैमान घातलं आहे. मंगळवारी महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ झाली आहे. केवळ मुंबईत करोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे. मंगळवारी मुंबईत करोनाचे ३९३ नवे रुग्ण सापडले. तर मुंबईतील धारावी परिसरात ४२ नवे रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, १०६ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.