Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नाशिकमध्ये ३७ कोरोनाचे रुग्ण झाले बरे, चाचण्या निगेटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/cornona_reuters-1.jpg)
नाशिक जिल्ह्यात रविवारी ३७ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याचा अहवाल आहे. यांपैकी २७ जण नाशिक शहरातील असून १० जण मालेगाव येथील आहेत. या सर्वांच्या करोनाच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. नाशिकमधील दोन रुग्णांचे उद्या एक्स रे चे रिपोर्ट येणार आहेत. ते आल्यानंतर त्यांच्या डिस्चार्जबाबत निर्णय होणार आहे.