Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: अहमदाबाद, सुरत, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांत सर्वाधिक रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/corona-virus-2-3-1-1.jpg)
अहमदाबाद, सुरत, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांत सर्वाधिक रुग्ण असल्यामुळे या भागात पाहणी आणि नियंत्रणासाठी केंद्राची चार नवी पथके स्थापन करण्यात आली असून ठाण्यावरही नजर असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील रुग्णसंख्या २३,४५२ झाली आहे. त्यात शुक्रवारी एका दिवसात १७५२ रुग्णांची भर पडली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४८१३ आहे. टाळेबंदी लागू केली नसती तर देशातील करोनाबाधितांचा आकडा एक लाखांहून अधिक असला असता. त्यामुळे टाळेबंदी योग्य वेळी अमलात आणली गेली, असे उच्चाधिकार गट-क्रमांक (१)चे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी सांगितले.