#CoronaVirus: “ही तर सुरुवात आहे, खरा विनाश तर अजून दिसायचाय”; WHO चा धोक्याचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/WHO-Chief.jpg)
करोनाने जगभरात थैमान घातला असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी खरा विनाश तर अजून दिसायचाय असं सांगत धोक्याचा इशारा दिला आहे. करोनाचा प्रभाव अद्यापही कमी झाला नसताना अनेक देश निर्बंध शिथील करत असल्याच्या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी हा इशारा दिला आहे. टेड्रोस यांनी यावेळी जगभरात जवळपास १ लाख ६६ हजारांहून जास्त जणांचा बळी घेणारा करोना व्हायरसचा प्रादुर्भाव का वाढेल याचं कोणतंही ठाम कारण सांगितलं नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने अफ्रिकेतून आजार पसरण्यास सुरुवात होईल असा दावा केला आहे. अफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्याने तेथून आजार पसरेल असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. “आमच्यावर विश्वास ठेवा, खरा विनाश तर अजून दिसायचाय,” असं टेड्रोस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. “हे संकट रोखायला हवं. हा एक व्हायरस आहे जो अद्यापही अनेक लोकांना समजलेला नाही,” असंही ते बोलले आहेत.