Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#Lockdown: अमेरिकन कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/r.jpg)
सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थिती अनेक देशामध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्याचाच परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवरही होताना दिसत आहे. न्यूयॉर्कमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. २० एप्रिल रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीत एवढी घसरण झाली की कच्च्या तेलाची किंमत बंद बाटलीतील पाण्यापेक्षाही कमी झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेत कच्च्या तेलाची किंमत शून्यापेक्षाही कमी म्हणजेच -३७.५६ डॉलर्स प्रति बॅरल इतकी घसरल्याचं पाहायला मिळालं. मे महिन्यात पुरवल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतीत ही घट झाली आहे.