Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“डॉक्टरांनी घाबरुन जाऊ नये. पीपीई किटचा पुरवठा लवकरच होईल”- मुंख्यमंत्री

Share On

पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे पीपीई किट पुरवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न शासनाकडून सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील खासगी डॉक्टरांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ज्या रुग्णांच्या काही जुन्या ट्रिटमेंट सुरु असतील त्यांच्यासाठी कुठलीही रुग्णालयं पूर्णपणे सुरु रहायला हवीत, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी रविवारी म्हणजे दुपारी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले.

मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्रातील डॉक्टरांना आवाहन करतो की त्यांनी घाबरुन जाऊ नये. सरकार म्हणून आम्हाला जेवढं शक्य आहे, ते आम्ही करतोय. राज्यात पीपीई किटचा तुटवडा आहे. त्यासाठी ज्यांच्याकडून या किटचा पुरवठा होईल त्यांच्याकडून आपण ते घेत आहोत. केंद्र शासनाकडूनही याचा पुरवठा होत आहे.”

“खासगी दवाखाने, हॉस्पिटल्स आणि क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टरांशी मी काल स्वतः बोललो, त्याचबरोबर आपले आरोग्य अधिकारी देखील त्यांच्याशी बोलले. यावेळी या डॉक्टरांनी आश्वसनं दिलं की, जे नॉन कोव्हिड रुग्ण आहेत. म्हणजेच ज्यांच्या जुन्या तक्रारी आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ही रुग्णालये कोणत्याही परिस्थितीत चालू राहिली पाहिजेत. नाहीतर करोना करोना करताना त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये,” अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button