#CoronaVirus | जगभरात 1.5 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Corona.jpg)
नवी दिल्ली | जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1.5 लाख पार गेली आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 1,54,126 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 22 लाखांवर पोहोचली आहे.
जगभरात कोरोना बाधितांचा आकडा 2,248,330 आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाने हैदोस घातला असून मृतांचा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या 24 तासांत चीनमध्ये 50 टक्यांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या 24 तासांत चीनमध्ये 1290 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांचा आकडा 4632वर पोहोचला आहे.
तसेच संसर्ग झालेल्यांचा आकड्यामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाली. चीनमध्ये गेल्या 24 तासांत 325 नवे रूग्ण आढळून आले. त्यामुळे चीनमधील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 82,692 वर पोहोचली आहे.