Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: मालेगावात कोरोना मृत्यूंची संख्या चार वर

मालेगावात शुक्रवारी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार नव्याने १४ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये आज सकाळी मृत पावलेल्या एका वृध्द डॉक्टरचा तसेच १३ एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या महिलेचा समावेश आहे. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. आतापर्यंत मालेगाव शहरात आढळून आलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७० झाली आहे.





