#War Against Corona: Breaking News : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/3-12.jpg)
पिंपरी। महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी, वायसीएम रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणा-या एका 45 वषींय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा विळखा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शनिवारी (११ एप्रिल) रात्री ११ वाजल्यापासून दापोडी, कासारवाडी परिसर सील करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा भाग ‘सील’ असणार आहे. तसेच शुक्रवारपासून (१० एप्रिल) भोसरीतील काही भागही सील केला आहे. पाच दिवसांपूर्वी खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर सील केला आहे. शनिवारपर्यंत पिंपरी-चिंचवडमधील सात भाग ‘सील’ केले आहेत.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा भाग ‘सील’ केला आहे.