breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोना अद्याप तिसऱ्या टप्प्यात नाही!
देशात करोनाचा समूह संसर्ग होऊ लागल्याचा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा, तसेच ‘आयसीएमआर’च्या अहवालातील दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी फेटाळला. करोनाच्या प्रादुर्भावाचा तिसरा टप्पा अजून गाठलेला नाही. समूह संसर्गातून कोरानाचा फैलाव झालेला नाही. पण हा टप्पा टाळण्यासाठी टाळेबंदी तसेच अन्य प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिले.