रूग्णांवर उपचार केल्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा – गजानन बाबर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना साथीच्या रुग्णांवर होणाऱ्या उपचारादरम्यान निर्माण होणाऱ्या कचऱ्याची हाताळणी, प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्याच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्याचा आरोग्य विभाग, प्रदूषण मंडळ तसेच नगर विकास विभाग यांना परिपत्रक काढून दिलेल्या आहेत. रुग्णांवर उपचार करीत असताना निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून तसेच त्याच्या हाताळणी पासून व विल्हेवाट इ पासून कोणताही संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
-19 कोरोना साथीचा रोग हा देशभर तसेच जगभरात पसरलेला असून या रोगाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी विविध पावले उचलली आहेत यामध्ये प्रामुख्याने covid-19 संशयित /पुष्टी झालेल्या रुग्णांच्या उपचाराकरिता नमुना संकलन केंद्र, प्रयोगशाळा, अलग ठेवणे केंद्र, होम केअर, आयसोलेशन वार्ड, प्रयोगशाळा, रुग्णालय तसेच, संयुक्त जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया व विल्हेवाट सुविधा (CBWTF) यांचा सामावेश आहे. तसेच त्यावर नियंत्रकांना याकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थानिक स्वराज्य संस्था आरोग्य विभाग यांना निर्देश दिले आहेत.
वरील उपचार सध्याच्या ज्ञानावर आणि व्यवस्थापनातील विद्यमान पद्धतीत आधारित असून याव्यतिरिक्त सामान्य जैववैद्यकीय कचरा यांच्यावर प्रक्रिया व विल्हेवाट सुविधा कायदा 2016 अंतर्गत यांचाही यामध्ये समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुसार कार्यप्रणाली करणे हे वरील सर्व घटकांना करणे बंधनकारक आहे. अलगाव वार्ड: covid-19 रुग्णांसाठी अलगाव वार्ड असणाऱ्या हेल्थकेअर सोयीसुविधा सुनिश्चित करण्यासाठी या चरणांचे अनुसरण करणे आवश्यक आहे.
निर्माण होणाऱ्या बायोमेडिकल कचऱ्याची सुरक्षित हाताळणी व विल्हेवाट लावणे प्रभागात स्वतंत्र रंगांचे कोडे डब्बे, पिशव्या, कंटेनर ठेवण्याची ची सुविधा ,त्यांचे योग्य विभाजन हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ,बायोमेडिकल वेस्ट ,तसेच सुधारित प्रणाली मार्गदर्शक सूचनांनुसार करणे गरजेचे आहे. खबरदारी म्हणून व त्या पिशव्यांची लिक न होण्यासाठी व त्यांची क्षमता वाढवण्यासाठी डबल लेअरच्या पिशव्या कचरा उचलण्यासाठी वापरल्या गेल्या पाहिजेत.
वॉर्डमध्ये किंवा तो कचरा उचलण्यासाठी CBWTF ने प्रमाणित केलेलेच स्टाफ वापरला गेला पाहिजे उपचारादरम्यान निर्माण होणारा कचरा साठवण्यासाठी तात्पुरती स्टोरेज रूम करावी व त्याला covid-19 असे लेबल लावावे व तो कचरा थेट त्या स्टोरेज रूम मधून संग्रहित व्हॅनमध्ये कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी ने उचलावा.
अनिवार्य लेबलिंग व्यतिरिक्त जैववैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या कंटेनर यांच्यावर covid-19 असे लेबल लावावे जेणेकरून कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी सहजपणे ओळखू शकतील व त्याची विल्हेवाट लावली जाईल.सामान्य कचरा दूषित न होण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन 2016 नियमा नुसार त्याची विल्हेवाट लावावी.
Covid-19 अलगाव वार्ड मधून निर्माण होणाऱ्या कचऱ्या ची नोंद ठेवावी तसेच covid-19 वार्ड मध्ये समर्पित ट्रॉली आणि संकलन डब्बे वापरावेत व त्यावर covid-19 च्या कचरा असे लेबलिंग करावे. Covid-19 कचऱ्याच्या साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कंटेनर ,डब्यांची ,ट्रॉलीची आतील आणि बाह्य पृष्ठभाग 1% सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाने संक्रमित करावे.अलगाव वार्ड उघडण्याचा किंवा प्रक्रियेचा अहवाल राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात यावा.जैववैद्यकीय कचरा व सामान्य घनकचरा यासाठी स्वतंत्रपणे समर्पित स्वच्छता कामगारांना नियुक्त करा जेणेकरून कचरा तात्पुरत्या संकलन वार्ड मध्ये हस्तांतरित केला जाऊ शकतो.रुग्णांच्या चाचणीच्या बाबतीत योग्य प्रमाणात लागू करण्यात आलेली केन्द्र आणि प्रयोगशाळा यांचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात यावा.अलग ठेवणे केंद्र व होम केअर छावण्या, शिबिरे मधून निर्माण होणारा सामान्य कचरा हा घनकचरा व्यवस्थापन नियम 16 कायद्यांतर्गत त्याची विल्हेवाट लावण्यात यावी तथापि जरा हा कचरा जैववैद्यकीय असेल तर तो स्वतंत्र पिवळ्या पिशव्यांमध्ये जमा करावा तसेच हा कचरा स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रमाणित करून दिलेल्या म्हणजेच कॉमन वेस्ट बायोमेडिकल ट्रीटमेंट फॅसिलिटी यांच्याकडे देण्यात यावा व त्यांनी गोळा करावा.
पुढील कर्तव्य बजावणे कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीने आवश्यक आहे अलगाव ठेवणे केंद्र विलगीकरण केंद्र घरामध्ये अलग ठेवलेले रुग्ण यांच्या उपचारादरम्यान निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा गोळा करणे, तसेच त्यासाठी कामगार सुनिश्चित करणे कामगारांना 3 स्तरांचे मुखवटे , पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट(PPE), एप्रोन ,हॅन्डग्लोज ,गम बूट आणि सेफ्टी गॉगल या त्यांच्या सुरक्षतेसाठी पुरवण्याचे काम तसेच कचरा गोळा करण्यासाठी समर्पित वाहन, तसेच असे वाहन सोडियम हायपोक्लोराईड किंवा कोणत्याही रासायनिक जंतुनाशका ने वाहन स्वच्छ केले जावे व या सर्वांचा अहवाल म कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी ने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना देण्यात यावा .
तसेच जास्त प्रमाणात कचरा जर निर्माण होत असेल तर अतिरिक्त तास करावेत व त्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे सादर करावा व स्थानिक स्वराज्य संस्थेचे त्याच्यावर नियंत्रण असावे. जैववैद्यकीय कचरा गोळा करणे प्रक्रिया करणे व त्याची विल्हेवाट लावणे याचा रिपोर्ट हा मेंटेन ठेवावा व तो CBWTF पुणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे सादर करावा तसेच आजाराची लक्षणे असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना सुविधेत काम करून देऊ नका अशा कामगारांना पुरेशा पगारी रजा द्यावी.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढील कर्तव्य बजावणे आवश्यक आहे covid-19 रुग्णांच्या ट्रीटमेंट वार्ड , अलगाव केंद्र, छावण्या , यांची नोंद ठेवणे.आवश्यकतेनुसार ज्यादा तास कम काम करण्याची CBWTFs ला परवानगी देणे व त्याची नोंद ठेवणे, जैववैद्यकीय कचरा याचा योग्य संग्रह आणि विल्हेवाट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार तसेच बायोमेडिकल वेस्ट कायदा 2016 अंतर्गत करणे.
वरील सर्व बाबी या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने तज्ज्ञांशी सल्लामसलत करून केलेले आहेत व याचा उद्देश covid-19 च्या रुग्णांच्या उपचारादरम्यान निघणाऱ्या कचऱ्याचे संग्रह , प्रक्रिया व त्याची विल्हेवाट ही योग्य पद्धतीने करणे व यापासून कोणताही संसर्ग तेथील डॉक्टर, नर्सेस , स्टाफ , बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी यामधील कामगार ,तसेच सामान्य नागरिक यांना होऊ नये व कोरोना साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यास आळा बसेल हा आहे.
मुंबई वोकहार्ट रुग्णालयातील डॉटर, नर्स स्टाफ जवळपास 52 जणांना कोरोना साथीचा संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रातील covid-19 च्या संबंधित रुग्णालयांनी विशेष खबरदारी म्हणून वरील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे पाळणे आवश्यक आहे जेणेकरून कोरोना सारख्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल. तरी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना त्या-त्या जिल्ह्यातील आरोग्य विभाग, स्वराज्य स्थानिक संस्था, व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना सूचना करण्याचे तसेच रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश आपल्या मार्फत राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना देण्यात यावेत, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.





