Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: कोरोनाचा विळखा; बारामतीत एकाचा मृत्यू, पुण्यातील मृतांचा आकडा २०

करोनाचा संसर्गामुळे राज्याच्या विविध भागात चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. विशेषतः मुंबई-पुण्यात रुग्णांच्या आकड्याबरोबर मृतांचा आकडा वाढू लागल्यानं सरकारची चिंता दिवसागणिक वाढत चालली आहे. बुधवारी पुण्यात तब्बल दहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. आजही पुणे शहर आणि जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यात बारामतीतील एका रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मृतांचा आकडा २० वर पोहोचला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.




