Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

#CoronaVirus: ‘चेन्नई एक्स्प्रेस’ निर्मात्याच्या मुलीला कोरोनाची लागण

‘चेन्नई एक्स्प्रेस’ या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते करिम मोरानी यांच्या मुलीला करोनाची लागण झाली आहे. शाजा मोरानी असं तिचं नाव असून मुंबईतल्या एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. शाजा मोरानीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबातील सर्व व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे. करिम हे शाहरुख खानचे जवळचे मित्र असून एका वेबसाइटला त्यांनी ही माहिती दिली. आश्चर्याची बाब म्हणजे, शाजाला करोनाची लक्षणेच दिसली नव्हती.

शाजाने ‘ऑलवेज कभी कभी’ आणि ‘हॅपी न्यू इअर’ या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शिकेचं काम केलं. तर करिम यांनी शाहरुखच्या बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘दिलवाले’, ‘हॅपी न्यू इअर’ आणि ‘रा वन’ या चित्रपटांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button