#CoronaFight #ReliefFund : भाजपचे उद्दीष्ट प्रथम केंद्र दुय्यम महाराष्ट्र
![बोगस एफडीआर प्रकरण; 'त्या' ठेकेदारावर फाैजदारीचे आदेश](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-1-2.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
जगभर “कोरोना” COVID – 19 विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा भारतातही परिणाम होताना दिसत आहे. या “कोरोना” COVID-19 विषाणूच्या प्रसारामुळे संपूर्ण भारतामध्ये काही प्रमाणात जिवीतहानी देखील झालेली आहे तसेच देशातील ब-याच नागरिकांची यामुळे उपासमार होत आहे.
या परिस्थितीतुन देशातील नागरिकांना सावरण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाचे सर्व नगरसदस्य/नगरसदस्या त्यांचे एक महिन्याचे मानधन देणेबाबत इच्छुक आहेत. त्यानुसार महापालिकेतील भारतीय जनता पार्टी व सलग्न असे एकूण ८५ नगरसदस्य/नगरसदस्या यांचे माहे मार्च २०२० चे मानधनाच्या एकत्रित रकमेचा धनादेश Prime Minister’s National Relief Fund ( PMNRF) यांना देणेत येणार आहे.
त्याचप्रमाणे आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर व आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखिल त्यांचे एक महिन्यांचे मानधन भाजपा आपदा कोष महाराष्ट्र प्रदेश यांना दिलेली आहे. अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे, सभागृह नेता नामदेव ढाके यांनी प्रसार माध्यमांना दिली.