Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

आरोग्य विमा आणि मोटार विमा यांचे प्रिमियम भरण्याच्या मुदतीत वाढ

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आरोग्य विमा आणि मोटार विमा यांचे प्रिमियम भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी ही घोषणा केली. ज्या विम्याचे प्रिमियम २५ मार्च ते १४ एप्रिल या काळात देय होते. त्यामध्ये २१ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे हे प्रिमियम सध्या तरी भरण्याची गडबड नाही. त्याचबरोबर प्रिमियम न भरल्यामुळे विमा पॉलिसी रद्द होणार नाही.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, थर्ड पार्टी वाहन विम्याच्या आणि आरोग्य विम्याच्या प्रिमियम भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे जरी या काळात ग्राहकाने त्याच्या विम्याचे नुतनीकरण केले नाही तर ती रद्दबातल ठरणार नाही.

२५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीतील विमा नूतनीकरण देय असलेल्या सर्व विमाधारकांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. या संदर्भात सरकारने शासकीय आदेश जारी केले आहेत.लॉकडाऊनचा विचार करून सामान्य ग्राहकांचे हित जपण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. या ग्राहकांना २१ एप्रिलच्या आता आपला विमा नूतनीकरण करावे लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group