Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

#CoronaVirus : शेअर बाजार कोसळला

मुंबई | करोना व्हायरसने जगभर मृत्यूचे थैमान मांडले आहे. लाॅक डाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्था महामंदीच्या खाईत लोटली जाणार आहे. त्याचे पडसाद आज भांडवली बाजारावर उमटले. आज मुंबई शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला तर निफ्टी ३०० अंकांनी घसरला आहे. यात गुंतवणूकदारांचे किमान दोन लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

आज देशभरातील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर झाली. गेले दोन आठवड्यात देशभरात करोना रोखण्यासाठी संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. मार्च महिन्यात वाहन विक्रीत घसरण झाली आहे. सर्वात मोठी उत्पादक मारुतीने मार्च मधील विक्रित ४७ टक्के घट झाल्याचे म्हटलं आहे. त्याचा परिणाम गुंतवणूकदारांवर दिसून आला. वाहन उत्पादकांच्या शेअरमध्ये आज विक्रीचा ओघ वाढला होतो. विकास दरात मोठी घसरण होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. यातून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button