#CoronaVirus: CRPF कडून 33 कोटी 81 लाख रुपयांची मदत

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी खासगी तसेस सरकारी संस्थाकडून मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पंतप्रधान सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. सीआरपीएफकडून ३३ कोटी ८१ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातल आहे. दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाला नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे देश ठप्प झाला असला तरी कठोर निर्णयानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूमुळे देशावर मोठे संकट निर्माण झाले आहे. देशातील गरिब आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांसमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार आवश्यक ती मदत पुरवण्याठी प्रयत्नशील आहे. केंद्राकडून विविध पॅकेजची घोषणा करुन देशवासियांना दिलासा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्ष एकत्रित मिळून कोरोनाशी लढा देताना दिसत आहेत.




