Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पहिल्या कोरोनाबाधित पुण्यातील जोडप्याबाबत दिलासादायक बातमी
पुणे – राज्यातील पहिल्या कोरोनाबाधित जोडप्याविषयी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. या जोडप्याच्या पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, या चाचणीचा पहिला अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. या जोडप्याला १४ दिवस पुण्यातील नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.
दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला तर त्यांना आज घरी पाठवण्यात येईल. ९ मार्च रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर या जोडप्याला नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. हे दाम्पत्य राज्यातील कोरोना बाधित पहिले रुग्ण होते. दुबई सहलीवरून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. या जोडप्याच्या मुलीला देखील कोरोनाची बाधा झाली होती.