Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: 22 मार्चला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशातील कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं.पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील जेवढ्या देशांना प्रभावित केले नाही त्यापेक्षाही अधिक प्रभाव कोरोना विषाणूने केलं आहे. ही चिंताजनक बाब आहे. तुम्ही मला आतापर्यंत खूप काही दिलं आहे त्यामुळे या संकटाशी लढण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे असं मोदींनी म्हटलं…. 

तसेच मोदींना यावेळी एक महत्त्वाची घोषणा केली आहे …. मोदींनी जनता कर्फ्यूची मागणी केली आहे… जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेल्या निर्बंधांचे पालन प्रत्येक नागरिकाने करावं अशी मागणी पंतप्रधान मोदींनी केली आहे… .यानुसार आता २२ मार्चला सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारांनंही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे.

भारत सरकार देशाच्या स्थितीवर नजर ठेवून आहे. भारताची लोकसंख्या १३० कोटीच्या घरात आहे. आपण विकासासाठी प्रयत्नशील देश आहोत. आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. मात्र प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांचं पालन करु..तसेच कोणीही घाबरून न जाता फक्त नियमांच पालन करण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group