breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: वैजापुरातून कोरोना संशयित गायब, चारधाम यात्रा करून रुग्णालयात आला होता
औरंगाबाद | महाईन्यूज
राज्यासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असतानाच वैजापूर तालुक्यातील म्हस्की येथेही कोरोनाची लागण झाल्याचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. डाॅक्टरांनी त्याला घाटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. परंतु तो रुग्ण घाटीतही तपासणीसाठी पोहोचला नसल्याचे समजते. त्यामुळे आता या रुग्णाचा शोधून काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.
या बातमीने सबंध वैजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रुग्ण हा कोरोना बाधित क्षेत्रातून प्रवास करून आल्यामुळे तो बाधित असण्याची भीती व्यक्त होत आहे. परंतु कोरोना विषाणूंची लागण झाल्याची चाचणी केल्यानंतरच खरे काय ते स्पष्ट होणार असल्यामुळे या रुग्णाला औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले होते.