Breaking-newsपिंपरी / चिंचवड
फुगेवाडी येथील अंडरपासमध्ये विद्युत प्रकाश व्यवस्था, युवासेनेचा पाठपुरावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/IMG-20200314-WA0006.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
गेल्या कित्येक दिवसांपासून फुगेवाडी येथील कै. मीनाताई बाळासाहेब ठाकरे शाळेकडे जाण्यासाठी असलेल्या अंडरपासमध्ये लाईट नव्हती. त्यामुळे ये-जा करणा-या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पिंपरी युवासेनेच्या पाठपुराव्यानंतर तातडीने याठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली.
यासंदर्भात युवासेना आणि आशिर्वाद महिला संघाच्या शीला दिक्षित यांनी विद्युत विभागाला माहिती कळविली होती. त्यावर तातडीने विद्युत विभागाच्या कर्मचा-यांनी मागणीची दखल घेऊन याठिकाणी विद्युत प्रकाश व्यवस्था केली.