चला हवा येऊ द्या कलाकारांवर संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापुरात गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/chala-hava-yeu-dya.jpg)
सोलापूर | महाईन्यूज
झी मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या चला-हवा-येऊ-द्या या विनोदी कार्यक्रमात एका भागांमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मार्फ करून या अभिनेत्याचा रुपात दाखविण्यात आला होता, त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्यावतीने संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शाम कदम यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली आहे.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सोमवार, मंगळवार रात्री एका भागात राजश्री शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचे चुकीच्या पद्धतीने वापर केला होता हे अक्षेपार्ह व निषेधार्थ असल्याने चला हवा येऊ द्या चे कलाकार नीलेश साबळे कुशल बद्रिके भाऊ कदम यांच्या वर विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच जी वाहिनीनी या कृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे
यावेळी संभाजी ब्रिगेड सोलापूर शहराध्यक्ष श्याम कदम कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपशहर प्रमुख सोमनाथ पात्रे उपशहर प्रमुख आशुतोष माने उपशहर प्रमुख सीताराम बाबर सचिव सनी पटू संघटक संजय भोसले अनिल कोकाटे महेश भंडारे चेतन चौधरी ईत्यादी उपस्थित होते.