पंढरपुर पोलिस ठाण्यातच पोलिसांचा डॉल्बीवर धिंगाणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/3-18.jpg)
पंढरपूर |महाईन्यूज|
सार्वजनिक उत्सवात डाॅल्बी किंवा हाॅस्पीटल, शाळा, काॅलेजसह सार्वजनिक ठिकाणच्या संवेदनशिल परिसरात कर्कश आवाज करण्यास बंदी आहे. सर्वसामान्य मंडळानी डाॅल्बी लावण्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होतो. मात्र, पंढरपूर शहराच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी हिंदी गाण्यावर डाॅल्बी लावून अक्षरशा: धुमाकूळ घातल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध घातले असतानाच चक्क स्वत: बेधुंद होऊन पोलिस ठाण्यातच पोलिसांनी डान्स केला. डाॅल्बीच्या कर्कश आवाजाने परिसर दणाणून गेला होता. पोलिसांचा डान्स पाहण्यासाठी पोलिस ठाण्यासमोर बघ्याची मोठी गर्दी देखील झाली होती.
दरम्यान, ग्रामीण पोलिस अधिक्षक आता या प्रकरणातील पोलिस कर्मचा-यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.