Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

31 मार्चपर्यंत पालिकेच्या सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या सुट्ट्या रद्द

Share On
  • आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आदेश
  • सुट्टीवर गेलेले अधिकारी, कर्मचारी हजर राहणार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांसाठी वेळीच वैद्यकीय सेवा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्याकरिता डॉक्टर्स अथवा अन्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 31 मार्च 2020 पर्यंत सर्व विभागातील कर्मचा-यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. तसेच, सुट्टीवर गेलेल्या अधिकार व कर्मचा-यांना तुरंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करोनाचे तीन रुग्ण महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन विभागात उपचार घेत आहेत. करोनाचा प्रदुर्भाव वाढत चालला आहे. नागरिकांच्या मनामध्ये भिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय सेवा उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेत मध्यवर्ती नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.

आपात्कालीन परिस्थितीमध्ये उपचार पध्दती वेळेत पोहोच होण्यासाठी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वैद्यकीय विभागासह सर्वच विभागाच्या कर्मचा-यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. 31 मार्च पर्यंत एकाही कर्मचा-याला सुट्टी घेता येणार नाही. जे सुट्टीवर गेले आहेत. त्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे एकालाही सुट्टी घेता येणार नाही. शासकीय सुट्टीच्या दिवशी परवानगीशिवाय सुट्टी घेऊ नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button