Breaking-newsपिंपरी / चिंचवड

महागाईच्या विरोधात शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने तहसिलदारांना निवेदन

Share On

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज पिंपरी-चिंचवड तहसीलदारांना गॅस दरकपातीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डी येथील कार्यालयात नायब तहसीलदार अंकुश आटोळे यांना हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, घरगुती वापराच्या गॅस दरवाढीमुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त खर्चाचे ओझे वाढले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. प्रंचड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी व वाढतच चाललेली महागाई अधिकच अन्यायकारक होत चालली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ ही नागरिकांना वेठीस धरत आहे. त्यामुळे त्यांचे मासिक बजेट बिघडून नागरिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येत आहे.

याप्रसंगी पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे, जिल्हा सरचिटणीस राहूल काळभोर, विरेंद्र गायकवाड, युनुस बागवान, कुदंन कसबे, दिपक भंडारी, रोहीत शेळके आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button