शहराचे मुलभूत प्रश्न प्राधान्याने सोडवू – स्थायी सभापती संतोष लोंढे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/6-4.jpg)
स्थायी समितीच्या सभापती पदी संतोष लोंढे यांची बिनविरोध निवड
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील, तसेच प्रलंबित विकास कामे, नवनवीन प्रकल्प उभारुन शहराच्या विकासाला प्राधान्य देवू, असा विश्वास स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी महापाैर उषा ढोरे, उपमहापाैर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा सभापती राजेंद्र लांडगे, विधी सभापती आश्विनी बोबडे आदी उपस्थित होते.
लाेंढे म्हणाले की, नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यास प्रयत्न करु, आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण यासह जीवनाश्यक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु, तसेच पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन शहर विकासाचा समतोल साधण्यात येईल, असेही सांगितले. तसेच महापाैर उषा ढोरे यांनी लोंढे यांनी शुभेच्छा दिल्या.
पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, शहरातील प्रलंबित विकास कामांना वेग देवून निधी कमी पडू न देण्याची जबाबदारी आमची राहील. आंद्रा, भामा-आसखेड योजना मार्गी लावून 100 एमएलडी पाणी आणणे आवश्यक आहे. उपमहापाैर तुषार हिंगे म्हणाले की, स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आम्हाला मदत केली. त्याचे आम्ही आभार मानतो.