चक्क रस्त्यात पोस्टर धरून ‘मन फकिरा’चे हटके प्रमोशन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/5-1.jpg)
पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी|
“मराठी चित्रपटसृष्टीत आज नवनवीन प्रयोग होत आहेत. प्रेक्षकही त्यांना उत्तम प्रतिसाद देत आहे. यासाठी नेहमीच वेगवेगळ्या कल्पना अवलंबल्या जातात. मुंबईत विलेपार्ले आणि अंधेरी येथे तसेच पुणे येथील गुडलक हॉटेलजवळ, डेक्कन जिमखाना येथे अभिनेत्री व दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव या कलाकारांनी हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरत जेव्हा रसिकांना चित्रपटगृहाकडे यायचे आवाहन केले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/ESGf7H0X0AYzX7p.jpg)
रविवारी १ मार्चला विलेपार्ले आणि अंधेरी येथे आणि सोमवारी २ मार्चला गुडलक हॉटेलजवळ, डेक्कन जिमखाना येथे ही मंडळी चक्क फलक घेऊन उभे असलेले पाहायला मिळाले. त्यांच्या हातात अत्यंत कल्पक व लक्ष वेधून घेणारे फलक होते. ‘आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही तुमच्याकडे आलोय, तुम्ही थिएटरमध्ये तरी या…’, ‘आमचा सिनेमा तुम्ही आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी ते अगदी तुमच्या ‘एक्स’सोबतही पाहू शकता’, ‘मराठी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिलाच नाही तर मराठी सिनेमा चालणार कसा?’, असे फलक घेऊन हे कलाकार हमरस्त्यात उभे होते. लोकही त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते आणि चित्रपटासाठी येण्याचे आश्वासनही या कलाकारांना देत होते. मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मन फकिरा’ येत्या ६ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.