Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
‘नटसम्राट श्रीराम लागू’ नावाने दिला जाणार पुरस्कार,सरकारची घोषणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-21.png)
रंगभूमीवरचे नटसम्राट अशी ज्यांची ओळख होती ते दिवंगत ज्येष्ठ अभिनेते म्हणजे डॉ. श्रीराम लागू. त्यांच्या नावे नटसम्राट श्रीराम लागू पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने केली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-7.png)
श्रीराम लागू यांचं डिसेंबर २०१९ मध्ये निधन झालं. रंगभूमीवरचा नटसम्राट म्हणून त्यांची ओळख होती. श्रीराम लागू हे अभिनयाचं चालतंबोलतं विद्यापीठ होतं. रंगभूमी, चित्रपटसृष्टी यामध्ये त्यांनी दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे. त्यांच्या याच योगदानाचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
रंगभूमीवर अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कलाकाराला नटसम्राट श्रीराम लागू पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे.