‘Realme 6’ सीरीज स्मार्टफोन 5 मार्चला लाँच होणार…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-6.png)
रियलमी X50 प्रो लाँच नंतर कंपनीने आता ६ सीरिज स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीची ही बजेटमधील स्मार्टफोन सीरिज असणार आहे. यात ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. नुकतीच रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विटरवर अभिनेता सलमान खानसोबत एक फोटो शेअर केला होता. यात रियलमी ६ चा वॉटरमार्क दिसत होता.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/realme_6_series_twitter_madhav_sheth_1582699438383-1024x576.jpg)
रियलमी 6 आणि रियलमी 6 प्रो मध्ये हाईयर मॉडेल म्हणजे Realme 6 Pro स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट वर लॉन्च केला जाईल. या चिपसेट वर अजूनतरी कोणताही स्मार्टफोन लॉन्च झाला नाही. अर्थात् Realme 6 Pro जगातील पहिला फोन असेल जो स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट वर लॉन्च होईल. तर Realme 6 मध्ये मीडियाटेक हेलियो जी90 चिपसेट असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हेलियो जी90 वर पण आतापर्यंत कोणताही स्मार्टफोन लॉन्च झालेला नाही. म्हणजे Realme 6 जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक हेलियो जी90 सह बाजारात एंट्री घेईल.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/maxresdefault-1024x576.jpg)
रियलमी 6 स्मार्टफोन सिंगल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल तसेच Realme 6 Pro मध्ये डुअल पंच-होल डिस्प्ले मिळेल. दोन्ही स्मार्टफोन पंच-होल स्क्रीनच्या डावीकडे असेल. फोटो वरून स्पष्ट झाले आहे कि रियलमी 6 मध्ये एक सेल्फी कॅमेरा असेल तसेच रियलमी 6 प्रो मध्ये दोन सेल्फी कॅमेरा दिले जातील.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/realme-6-e1582706839927-1024x597.jpg)
Realme 6 सीरीज कंपनी क्वॉड रियर कॅमेऱ्यासह बाजारात आणेल. Realme 6 Pro मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा मिळेल तसेच Realme 6 मध्ये पण हाच कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. दोन्ही स्मार्टफोन प्राइमरी सेंसर सोबत अल्ट्रा वाइड लेंस, टेलीफोटो लेंस आणि अल्ट्रा मॅक्रो लेंसला पण सपोर्ट करतील. तसेच रियलमीच्या या आगामी स्मार्टफोन मध्ये 20X झूम पावर क्षमता पण असेल. कंपनीने स्पष्ट केले आहे कि कंपनी आपला नवीन स्मार्टफोन 90हर्ट्ज रिफ्रेश्ड रेट असलेल्या स्क्रीन वर लॉन्च करेल आणि हे फोन्स 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतील.
ब्लाईंड ऑर्डर
कंपनीने या सीरीजच्या फोन्ससाठी आपल्या वेबसाइट वर ब्लाईंड ऑर्डरची माहिती पण दिली आहे. हि ब्लाईंड ऑर्डर 26 फेब्रुवारी पासून सुरु झालेलीआहे त्यांची अंतिम तारिख 4 मार्च पर्यंत असणारे या काळात ग्राहक 1000 रुपये देऊन फोन प्री-बुक करू शकतात. रियलमी 6 सह ग्राहकांना रियलमी बड्स 2 फ्री मिळतील. तसेच रियलमी 6 प्रो सह 1000 रुपयांचे गिफ्ट वाउचर मिळणारेत .