LPG Cylinder Price : गॅस सिलिंडर 53 रुपयांनी झाला स्वस्त
नवी दिल्ली | महाईन्यूज | ऑनलाईन | टीम
तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 1 मार्चपासून म्हणजेच आजपासून 53 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याचबरोबर 19 किलो वजनाचा विना अनुदानित सिलिंडरही 84.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. हे दर आजपासून लागू झाले आहेत.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आतापर्यंत 858.50 रुपयांना उपलब्ध होणारा सिलिंडर आता 805.50 रुपयात उपलब्ध होईल. गेल्या महिन्यात विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत सुमारे दीडशे रुपयांनी वाढ झाली होती. सर्व महानगरांमध्ये 12 फेब्रुवारीपासून अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 144.50 रुपयांवरून 149 रुपयांवर आणली गेली.
विना अनुदानित गॅस सिलिंडरचे चार महानगरांमधील दर
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 805.50 रुपये आहे. त्याचबरोबर विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 839.50 रुपये, मुंबईत 776.50 आणि चेन्नईमध्ये 826 रुपये आहे.