हभप भरतबुवा रामदासी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बीड | राष्ट्रीय कीर्तनकार तथा हभप भरतबुवा रामदासी यांचे हृदविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले,मृत्यूसमयी ते 57 वर्षाचे होते. ख्यातनाम कीर्तनकार म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
मूळ गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावचे रहिवासी असलेले भरतबुवा यांचे देशभरात नाव होते. गुजरात, मध्यप्रदेश, बिहार,दिल्ली यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे कीर्तन लोकप्रिय होते.
प्रचंड व्यासंग,अभ्यासपूर्ण मांडणी,साहित्य,इतिहास याविष्यावरील त्यांचे ज्ञान वादातीत होते .त्यांच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द हा प्रमाण होता. संतसाहित्य तसेच इतिहास कालीन विषयावर त्यांची हजारो कीर्तने गाजलेली आहेत.
शनिवारी सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते, तेथेच त्यांना हृदयविकार चा झटका आला अन त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पत्नी प्रज्ञा,मुलगा ऋतुपर्ण ,भाऊ असा परिवार आहे.