Breaking-newsमनोरंजन
आरारा… माझी पॅंट फाटली.

मुंबई – वरातीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नवरदेवाची अवस्था पाहून अनेकांना हसू अवरेनासे झाले आहे. अखेर नवरदेवाचा पारा चढला आणि वऱ्हाड्यांवरच त्याने आपला राग व्यक्त केला.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाची फजिती झाली आहे. घोड्यावर बसताना त्याची पँट फाटली. वैतागलेला नवरदेव म्हणाला, ‘माझी पँट फाटली आहे…’ आणि त्यानंतर तो दुसरी पँट आणण्याचे आदेश देतो. शिवाय, त्याने वऱ्हाड्यांवरच राग काढला आहे. यावेळी कोणीतरी मोबाईलमध्ये कैद करून टिकटॉकवर पोस्ट केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.




