Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बिघडली ; उपचारासाठी मुंबईला हलवले

पुणे | भाजपाचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बुधवारी रात्री बिघडली. अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तातडीनं साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रक्तदाबाचा त्रास वाढल्यानं त्यांची तब्येत बिघडली. सध्या त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे.

आमदार शिवेंद्रराजे भोसले हे बुधवारी त्यांच्या ‘सुरुची’ बंगल्यावर होते. यावेळी त्यांना रात्री उशिरा अचानक रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. शिवेंद्रराजे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वेदांतिका राजेदेखील रुग्णलायात असल्याची माहिती आहे.

आमदार शिवेंद्रराजे यांना सुरूवातीला साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना चांगलं वाटल्यास घरी सोडणार असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group