Breaking-newsमहाराष्ट्र

संतापजनक! अडीच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

लोणी | महाईन्यूज

एका अडीच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. लोणी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अडीच वर्षीय मुलीवर १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी व अडीच वर्षीय पीडित मुलगी दोघांचेही घर एकाच परिसरात आहे.

पीडित चिमुकली या अल्पवयीन मुलाच्या घरी शनिवारी दुपारी खेळायला गेली असता आरोपीने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. या घटनेची माहिती चिमुकलीने तिच्या आईला दिली. पीडित मुलीचे वडील त्यावेळी शेतात कामाला गेले होते. मुलीच्या आईने घटनेची माहिती तिच्या वडिलांना दिल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी लोणी टाकळी पोलिसांनी १७ वर्षीय आरोपीला अटक करून बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे. या घटनेने गावात संतापाचे वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group