इंदुरीकर महाराजांवर खासदार सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/supriya-sule-.jpg)
श्रीरामपूर | महाईन्यूज
गर्भलिंग चाचणीसंदर्भात कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यावर विविध स्तरातून संतापजनक टीका होत आहे. यामध्येच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही इंदुरीकर महाराज यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या यावेळी बोलत होत्या.सुप्रिया सुळे यांनी इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य दुर्देवी असल्याचं म्हणत खंत व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या, ‘पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशाप्रकराची अंधश्रद्धा पसरवली जाणं हे दुर्दैवी आहे. किर्तनकारांबद्दल माझ्या मनात मान सन्मानच आहे. माझी श्रद्धा आहे. पण अंधश्रद्धा नाही. यशवंतराव चव्हाणांच्या, दाभोळकरांच्या संस्कारात आम्ही वाढलो आहोत. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणे दुर्दैवी आहे. राज्यातील वाढते महिला अत्याचार हा सामाजिक प्रश्न असून फक्त कायदे कडक करून हा प्रश्न सुटणार नाही, तर समाजात प्रबोधन करण्याची गरज असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं. घरगुती अत्याचाराच्या घटना का वाढत आहेत याचा विचार करण्याची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.