नवऱ्याने मित्रालाच सांगितले बायकोवर बलात्कार कर!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/rape-child.jpg)
पुणे | पुण्यातील कात्रजमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेवर तिच्या पतीच्याच मित्राने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पतीच्या परवानगीनेच मित्राने त्याच्या बायकोवर बलात्कार केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय विवाहित महिलेने पोलिसात तक्रार देखील दाखल केली.
ही घटना मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडली होती. ज्याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीच्या मित्राला अटक केली असून आता त्याची कसून चौकशी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एके दिवशी आरोपी सुरेश शिंदे याने अचानक रुममध्ये घुसून आपल्याच मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला. पीडित महिला आणि तिचा पती हे पुण्यातील एका हॉस्टेलमध्ये राहत होते. हे दोघेबी पुण्यातच कामाला होते. त्यामुळे ते हॉस्टेलला राहत होते.
मात्र, गेल्या वर्षी अचानक या विवाहित महिलेसोबत अत्यंत भयंकर प्रकार घडला. जेव्हा सुरेश शिंदे याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर याबाबत तिने आपल्या पतीला माहिती दिली. पण त्यावेळी नवऱ्याने बायकोला जे काही सांगितलं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ‘मीच सुरेशला तुझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितलं होतं.’ असं त्याने आपल्या बायकोला सांगितलं. या संपूर्ण प्रकारने पीडित महिला अक्षरश: हादरून गेली.
या घटनेनंतर महिलेने पुण्यात न राहण्याचा निर्णय घेतला आणि ती थेट तिच्या माहेरी म्हणजेच परभणीला निघून गेली. त्यानंतर तिने याप्रकरणी पोलीस तक्रार देखील नोंदवली. सध्या हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच असाच प्रकार मुंबईतील जोगेश्वरी इथे घडला होता. इथेही पतीने आपल्या फेसबुक मित्रांना पत्नीवर बलात्कार करण्यास सांगितलं होतं.