चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे बळी ८१३ वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/jayant-Patil-copy.jpg)
बिजिंग | महाईन्यूज
चीनमध्येकोरोना विषाणूच्या संसर्गाने बळी घेतलेल्यांची संख्या आता ८१३ झाली आहे. २००२-०३ साली सार्स विषाणूच्या संसर्गाने घेतलेल्या बळींपेक्षा कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा जास्त झाला आहे. कोरोनाची लागण जगातील २५ देशांमध्ये झालेली आहे.
चीनमध्ये शनिवारी ८९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाचा संसर्ग झालेले २,६५६ नवे रुग्ण आढळून आले. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, चीनमधील ३१ प्रांतांमध्ये ३७,१९८ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. २००२-०३ साली सार्स विषाणूच्या संसर्गाने चीन, हाँगकाँग व अन्य प्रदेशांत एकूण ७७४ जणांचे बळी घेतले होते. त्यापेक्षा अधिक लोक कोरोनाच्या साथीमध्ये मरण पावले आहेत. चीनमधील हुबेई प्रांतात ८१, हेनानमध्ये २, हेबेई, हेलाँगजिआंग, शॅडाँग, अनहुई, हुनान, ग्वांगक्षी-झुआंग या प्रांतांमध्ये प्रत्येकी एक जण शनिवारी मरण पावला. हुबेई प्रांतातील ३२४सह सुमारे ६०० लोकांना उपचारांनंतर रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी शनिवारी देण्यात आली.