एक्झिट पोलमध्ये दावा : दिल्लीत पुन्हा बहुमताने केजरीवाल सरकार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/All-copy.jpg)
नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सर्व 70 जागांसाठी शनिवारी मतदान झाले. रात्री 11 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार दिल्लीत सरासरी 61.71 टक्के मतदानाचीच नाेंद झाली.
11 फेब्रुवारीला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. मतदानानंतर विविध न्यूज चॅनल्स आणि सर्व्हे संस्थांनी एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये केजरीवाल सरकार पुन्हा येण्याची शक्यता वर्तवली आहे. आठ पोलच्या सरासरीत आपला 54, भाजपला 15 तर काँग्रेसला एकच जागा मिळण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी रात्री 8.30 वाजता आढावा बैठक बोलावली. केजरीवाल यांनीही ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत आपच्या नेत्यांसोबत बैठक घेतली.
एक्झिट पोल | आप | भाजपा | कॉंग्रेस |
एबीपी न्यूज-सी वोटर | ४९-६३ | ०५-२० | ००-०३ |
टाइम्स नाउ- आईपीएसओएस | ४४ | २६ | ०० |
टीवी 9-भारतवर्ष-सिसरो | ४४ | २६ | ०० |
न्यूज एक्स-पोल स्टार | ५०-५६ | १०-१४ | ० |
इंडिया न्यूज-नेता | ५३-५७ | ११-१७ | ००-०२ |
रिपब्लिक-जन की बात | ४८-६१ | ०९-२१ | ००-०१ |
2013 मध्ये 2008 च्या तुलनेत 8.05% जास्त मतदान झाले. त्रिशंकू विधानसभेत आपने काँग्रेसच्या पाठिंब्यावर 49 दिवस सरकार चालवले. मात्र, 2015 मध्ये पुन्हा निवडणूक झाली. त्यात दिल्लीतील आजवरचे सर्वाधिक 67.12% मतदान झाले. आपने 67 जागा जिंकून सत्ता मिळवली.