सरकारी बँकां उघडण्याच्या आणि बँकेत पैसे जमा करण्याच्या वेळेत बदल…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-60.png)
बँक ग्राहक आणि त्यांचे कर्मचारी, दोघांसाठी मोठी बातमी आहे. सरकारी बँकांची उघडण्याची वेळ बदलली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून याची सुरुवात झाली आहे. या दोन्ही राज्यात सरकारी बँका आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु राहतील. आता ग्राहक ५ वाजताही रक्कम जमा करु शकणार आहेत . पूर्वी बँकांमध्ये दुपारी २ वाजेपर्यंतच रक्कम जमा करता येत होती.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/bank_customers-621x414-1.jpg)
राजस्थानमध्येही बँकांनी वेळ बदलली आहे. मध्य प्रदेशच्या राज्यस्तरीय बँकर्स समिती भोपाळकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार बँकिग कामाची वेळ सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. बँक ६ वाजता बंद होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तुम्ही बँकेत पैसे जमा करु शकता किंवा काढू शकता. राज्यस्तरीय बँकर्स समितीने याबाबतचे निर्देश सर्व बँकांना पाठवले आहेत. ही वेळ १ जानेवारीपासूनच लागू होणार होती.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/axis-kyW-621x414@LiveMint.jpg)
अर्थ मंत्रालयाने मागील वर्षीच सरकारी नियंत्रण असणाऱ्या बँकांच्या कामकाजाची वेळ समान ठेवण्याचे निर्देश दिले होते. परंतु, विविध बँकांमध्ये ताळमेळ न झाल्यामुळे यावर अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. पूर्वी बँकांना वेळेचे ३ पर्याय देण्यात आले होते. पहिला पर्याय- सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत. दुसरा- सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत आणि तिसरा पर्याय- सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.