Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

खाजगी बस जळून खाक;नशीब बलवत्तर म्हणून ४८ प्रवासी थोडक्यात बचावले

मुंबई | महाईन्यूज

धावत्या वाहनांना आग लागण्याच्या गेल्या दिवसांपासून वारंवार घडत आहे. अशीच एक थरारक घटना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडली. कणकवलीवरून मुंबईकडे निघालेल्या भरधाव खाजगी बसनं पेट घेतला. या आगीत बस पूर्ण जळून खाक झाली आहे. दैव बलवत्तर म्हणून बसमधील ४८ प्रवासी थोडक्यात बचावलेले आहेत.

साई पूजा या खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची आराम बस (MH 04- FK-009) कोकणातील कणकवली येथून ४८ प्रवासी घेऊन मुंबईकडे जात होती. पोलादपूर शहरापासून पुढे काही अंतरावर आल्यानंतर गाडीच्या मागील बाजूने धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने बस थाबवून प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. मध्यरात्री २ दोन वाजताची वेळ असल्याने लवकर मदत मिळाली नाही. वेळेत मदत न मिळाल्यानं बस जळून राख झाली. पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group