पिंपरी मेट्रो स्टेशनचे नामकरण, माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्या पाठपुराव्याला यश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Raju-durge.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरीचिंचवड महापालिकेसमोर होत असलेल्या पुणे मेट्रो स्टेशनला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेट्रो स्टेशन असे नाव देण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केली होती. त्यावर सभापती विलास मडिगेरी यांनी सर्व सदस्यांच्या अनुमतीने नामकरणाचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे शहरातील संबंध धनगर समाजाच्या वतीने दुर्गे यांनी मडिगेरी यांच्यासह पालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी यांचे अभार मानले आहेत.
शनिवारी (दि. 1) महापौर माई उर्फ उषा ढोरे त्याच प्रमाणे स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी यांना दुर्गे यांनी मेट्रो स्टेशनला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेट्रो स्टेशन असे नाव देण्याची मागणी केली. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी अशीही विनंती केली. त्यानुसार महापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांनी लगेचच मेट्रो अधिकारी, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी यांनी मंगळवारी (दि. 4) हा विषय मंजूर करण्याचे मान्य केले. या बैठखीला दुर्गे स्वतः उपस्थित होते.
या बैठकीत मेट्रोचे नामकरण (पुणे पिंपरी-चिंचवड मेट्रो) असे त्याच प्रमाणे पिंपरी मनपा समोरील मेट्रो स्टेशनचे नामकरण (पुण्यण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेट्रो स्टेशन पिसीएमसी पिंपरी) असे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी तसेच स्थायी समितीमधील सर्व पक्षीय सदस्य या सर्वांनी काल बुधवारी स्थायी समिती सभेत पिंपरी येथे अहिल्यादेवी चौकात होत असलेल्या मेट्रो स्टेशनचे (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेट्रो स्टेशन पीसीएमसी पिंपरी) नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजुर केला.
यासर्व प्रक्रियेत महापौर, उपमहापौर, आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष आणि सर्व स्थायी समिती सदस्य, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी, मेट्रोचे सर्व अधिकारी यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील तमाम धनगर समाज बांधवांच्या वतीने राजू दुर्गे यांनी सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले आहे.