टपरी, पथारी, हातगाडी पंचायततर्फे ‘फेरीवाला जनजागृती अभियान’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
टपरी, पथारी हातगाडी धारकांसाठी २००७ साली पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिला कायदा केला, त्यास आज दहा वर्षापेक्षा अधिक काळ झाला असून अद्याप महापालिकेने एकही हॉकर्स झोन तयार केला नाही. फेरीवाला धोरण कागदावर राहिले आहे. त्याची अंमलबजावनी होण्यासाठी टपरी पाथरी हातगाडी पंचायतच्या वतीने फेरीवाला जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.
यावेळी मळेकर या महिलेस संघटनेने छापलेला जनजागृती फॉर्म देऊन अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी टपरी पथारी हातगाडी पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, प्रदेश सचिव प्रल्हाद कांबळे, शहराध्यक्ष रमेश शिंदे, उपाध्यक्ष गणेश आहेर, मलिक शेख, काशिनाथ रसाळ, आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हॉकर्स तोरण २००७. राष्ट्रीय हॉकर्स पॉलिसी २००६ (केंद्र सरकार), नगरपालिका आणि महानगरपालिका फेरीवाला व्यवसायाचे विनियमत (आदर्श उपविधी 2009), पत विक्रेता उपजीविकेचे संरक्षण व विक्री अधिनियम 2014 ( केंद्र सरकार), पत विक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पत्र विक्री महाराष्ट्र योजना 2017 (महाराष्ट्र सरकार) हे नियम कायदे फेरीवाल्यांसाठी करण्यात आले. त्याची अंमलबजावणी आजतागायत झाली नाही. यामुळे टपरी पथारी हातगाडी धारकांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे.
याबाबतची माहिती नसल्यामुळे फेरीवाले ब अनेक वर्षांपासून अन्याय सहन करत आहेत. फेरीवाल्यांसाठी झालेल्या कायद्याची त्यांना माहिती व्हावी अन्याय, अत्याचार विरोधात त्यांनी आवाज उठवावा, यासाठी टपरी पथरी हातगाडी पंचायत वतीने फेरीवाला जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. १० फेब्रुावारीपर्यंत शहरात “रिक्षा” फिरवून जनजागृती केली जाणार आहे. ज्या टपरी पथारी हातगाडी धारकांचे महापालिकेने सर्वेक्षण केले नाही. अशांचे संर्व्हेक्षण फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली.




