Breaking-newsराष्ट्रिय

वुहानमधील भारतीयांना मायदेशी आणण्यास विमान सज्ज

महाईन्यूज

चीनमध्ये वुहान शहरात करोना विषाणूचा प्रसार जोरात असतानाच तेथे अडकून पडलेल्या २५० भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी मुंबईत एअर इंडियाने ४२३ आसनांचे खास विमान सज्ज ठेवलेले आहे.

अधिकृत सूत्रांनी मंगळवारी सांगितले की, भारतीय नागरिकांना करोनाग्रस्त वुहान येथून भारतात आणण्यासाठी हे खास विमान रवाना करण्याकरिता आम्ही परराष्ट्र मंत्रालय व आरोग्य मंत्रालय यांच्या परवानगीची वाट पाहात आहोत. सरकारने विविध मंत्रालयांना प्राप्त परिस्थिती हाताळण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही बोईंग ७४७-४० विमान मुंबईत सज्ज ठेवले असून परवानगी मिळताच ते चीनला रवाना होईल. तेथे २५० भारतीय अडकून पडले आहेत त्यांची सुटका करून भारतात आणले जाईल. सोमवारी मंत्रिमंडळ सचिवांनी बैठक घेतली असून त्यात वुहान येथील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button