Breaking-newsमनोरंजन

हृतिक रोशनच नाही तर त्याची आईही आहे सुपर डान्सर…

अभिनेता हृतिक रोशन त्याच्या लुक आणि एक्टींगसोबतच त्याच्या डान्समुळे लोकप्रिय आहे… धूम, वॉर या चित्रपटातील त्याच्या सीनसोबतच त्याचा डान्सही तुफान लोकप्रिय झाला होता. परंतु केवळ हृतिकचं नाही तर त्याची आई पिंकी रोशनदेखील सुंदर नृत्य करतात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अलिकडेच हृतिक त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राजस्थानला फिरायला गेला होता. यावेळचे अनेक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.याच पिकनिकमधील त्याच्या आईचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात त्या डान्स करताना दिसत आहेत.

हृतिकच्या आईने ‘वॉर’ चित्रपटातील ‘घुंगरु’ या गाण्यावर डान्स केला. यावेळी त्या एकट्या नसून त्यांच्यासोबत घरातील अन्य दोन महिलादेखील होत्या. विशेष म्हणजे पिंकी रोशन या वयामध्येही उत्तम डान्स करत असल्याचं दिसून येतं आहे…

दरम्यान, याच पिकनिकमध्येच सुनैनाचा वाढदिवसदेखील सेलिब्रेट करण्यात आला. यावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. अलिकडेच हृतिकचा ‘वॉर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफने स्क्रीन शेअर केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button