शिवाय चित्रपटातील ‘ही’ नायिका आहे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याची नात…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/23.png)
“कागजात पर दस्तकत मैं हमेशा अपने कलमसे करता हूँ”… 1982 मध्ये विधाता चित्रपटासोबतच या चित्रपटातला डायलॉग आपल्या अंदाजाने फेमस करणारे म्हणजे दिलीप कुमार… दिलीप कुमार यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं… आता त्यांची नात त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/sayesha_saigal-12_1464263.jpg)
अजय देवगणसोबत ‘शिवाय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सायेशा सहगल ही दिलीप कुमार यांची नात आहे. सायेशा अभिनेता सुमित सेहगल आणि अभिनेत्री शाहीन बानू यांची मुलगी आहे… फार कमी लोकांना सायेशा दिलीप कुमार यांची नात असल्याची माहिती आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Capture-51.png)
शिवाय चित्रपटानंतर सायेशा बॉलिवूडमधील कोणत्या चित्रपटात दिसली नाही. बॉलिवूडपेक्षा टॉलीवूडमध्ये ती जास्त रमली.तेथील अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं असून नावारुपास आली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/3-27.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/4-23.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/11-8.jpg)
त्यानंतर २०१९ मध्ये तिने अभिनेता आर्या याच्यासोबत लग्न केलं. आर्या टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे.सायेशा आणि आर्या यांच्यात १७ वर्षाचं अतंर आहे.