लेकीला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान न मिळाल्यान वडील नाराज

नवी दिल्ली | राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये भारतीय नेमबाज मनु भाकरचा समावेश नसल्यामुळे तिच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनु भाकर हिच्या वडील रामकिशन यांनी या पुरस्कारासाठीच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १७ वर्षी मनु भाकरने आंतरराष्ट्री स्पर्धेत अनेक पदके मिळवली आहे. २०१८ मध्ये १६ वर्षी मनु भाकरने मॅक्सिकोमध्ये झालेल्या आयएसएसएफ विश्व कप स्पर्धेत सुवर्ण कमाई करुन विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. या स्पर्धेत सुवर्ण मिळवणारी ती सर्वात युवा नेमबाज ठरली होती.
चांगली कामगिरी करुनही तिच्याकडे दुर्लक्ष करणे निराशजनक आहे. पुरस्कारासाठी निवड होण्यासंदर्भात नेमके कोणते मापदंड आहेत? ती यासाठी पात्र नाही का? असे प्रश्न उपस्थित करत रामकिशन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच बाल पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. बेंगळुरुच्या यश अराध्य हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय मोटरस्पोर्ट्स चालक ठरला.
कोविंद यांच्या हस्ते ५ ते १८ वयाच्या ४९ बालकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजसेवा, शालेय शिक्षा, कला, क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बालकांना देण्यात येतो. १ लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यासंदर्भात महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.पण त्यांच्यासोबत कोणताही संपर्क होऊ शकला नव्हता, अशी माहितीही रामकिशन यांनी दिली आहे. या पुरस्कारासाठी आम्ही वेळेपूर्वी अर्ज केला होता. जेव्हा मनुचे नाव यादीत नसल्याचे समजले तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांसी फोनवरुन संपर्क केला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असेही रामकिशन यांनी म्हटले आहे.





