breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
मनसेत ‘अमितपर्व’ ; पक्षाच्या नेतेपदी निवड, महाअधिवेशनात घोषणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/amit-thackeray.jpg)
मुंबई | मनसेच्या मुंबईतील महाअधिवेशनात अखेर राजपुत्र अमित ठाकरे यांचं लाँचिंग झालं. त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली.
सर्वांच्या संमतीनं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित यांच्या नावाचा ठराव मांडला. अमित राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड करत आहोत, अशी घोषणा बाळा नांदगावकर यांनी केली. त्यानंतर तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमस्थळी टाळ्यांच्या कडकडाटात एकच जल्लोष झाला. नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी शिक्षणाचा ठराव मांडला. अमित यांच्या लॉन्चिंगची घोषणा झाल्या, त्यांच्या आई तसंच पत्नीचे डोळे पाणावले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा |