रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 57 गाड्या घटनास्थळी
सुरत | गुजरातमधील सुरत येथील एका बाजारपेठेत आज सकाळी भीषण आग लागली. वृत्त एजन्सी ने दिलेल्यामाहितीनुसार, अग्निशमन दलाच्या 57 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त अद्यापतरी नाही आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दहा मजली मार्केटच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे.
अग्निशमन दलाचे 200 जवान आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. सुरत, बारडोली, कुंभारिया, होळीवाला, हजीरा येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच या आगीच्या धुराचं साम्राज्य आजूबाजूच्या परिसरात पसरल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सरोली परिसरातील संपूर्ण 10 मजली कापड्याचा बाजारात आगीनं पेट घेतला आहे. काही दिवसांपूर्वी या बाजाराच्या 9 व्या मजल्यावर आग लागली होती.