धनंजय मुंडेंच्या जागेवर पवारांचा ‘खास माणूस’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/dhananjay-munde-and-sharad-pawar-1.jpg)
मुंबई | महाईन्यूज
पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर राष्ट्रवादीकडून काँग्रेस नेत्याला संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून संजय दौंड हे उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर भाजपकडून राजन तेली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे निश्चित झालेलं आहे.
माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र संजय दौंड हे विधानपरिषदेच्या उर्वरित कार्यकाळासाठी नशिब आजमावणार आहेत. दौंड आणि पवार कुटुंबीयांचे जवळचे संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय दौंड यांना शब्द दिलेला होता. त्यानुसार दौंड यांची परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मदत झालेली होती. यानंतर धनंजय मुंडे निवडूनही आले आहेत. आता धनंजय मुंडेंच्या जागेवर राष्ट्रवादीने दौंड यांनाच संधी दिलेली आहे.